मुंबई ते गोवा जाणाऱ्या क्रूजवर चालक दलाचे एक सदस्य कोरोना पॉसिटीव्ह निघाल्यानंतर क्रूजवर असलेल्या सर्व २००० प्रवाशांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. इतकेच नाही तर गोवा सरकारने सर्वांची कोरोना टेस्ट होईपर्यंत क्रूजला डॉक करण्याची अनुमती दिलेली नाही. कॉर्डेलिया क्रूज इम्प्रेस नावाचे हे जहाज मुंबई ते गोवाला जात होते पण शनिवारी रात्री क्रूजवरील एक व्यक्तीचा कोविड रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. यामुळे या क्रूज वरून कोणत्याही व्यक्तीला टेस्ट केल्याशिवाय जहाजातून उतरता येणार नाही.
गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी म्हटले कि, “प्रवाशांची कोरोना टेस्ट केल्यांनतर काहींची कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आली आहे. त्यांनी म्हटले कि, आम्ही जहाजाला डॉक करण्याची परवानगी दिलेली नाही. कोविड चाचणीसाठी त्याचा खाजगी रुग्णालयाशी करार आहे आणि आम्ही सर्व प्रवाशांना जहाज सोडण्यापूर्वी चाचणी घेण्यास सांगितले आहे”. जहाज सध्या मोरमुगओ पोर्ट कूज टर्मिनलवर आहे. इतर प्रवाशी कोरोना टेस्ट रिपोर्टची वाट पाहत आहेत.