1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष सूरज ठाकूर यांचा राजीनामा; पक्षांतर्गत संघर्षातून घेतला निर्णय

suraj thakur
Spread the love

देशभरात काँग्रेस पक्षात आता कुठे जोश भरत असल्याचे चित्र असतानाच मुंबई काँग्रेस पक्षातील अंतर्गत धूसफूस पुढे आली आहे. युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सूरज सिंह ठाकुर यांनी राजीनामा दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते स्वबळाची भाषा करत आहेत. अशात मुंबई युवा काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी उफाळल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे मिळून तिन पक्षांचे सरकार आहे. महाविकास आघाडी करुन हे सरकार सत्तेत आले आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

काँग्रेस पक्षाने मंगळवारी (25 ऑगस्ट) सायंकाळी मुंबई युवा काँग्रेस अध्यक्ष पद जाहीर केले. या पदावर माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा आणदार जीशान सिद्दीकी यांची निवड झाली. तर माजी NSUI मुंबई अध्यक्ष सूरज सिंह ठाकुर यांना कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले. दरम्यान, युवा काँग्रेस पदासाठी झालेल्या निवडीवेळी जीशान सिद्दीकी आणि सूरज सिंह ठाकूर हे मुख्य दावेदार होते. यात पक्षाने जीशान यांच्या अध्यक्ष दावार शिक्कामोर्तब केले.

आता आमदार जिशान सिद्दीकी यांचे स्पर्धक असलेलेल कार्यकारी अध्यक्ष सूरज सिंह ठाकुर यांनी बंड केले असून, त्यांनी आपला राजीनामा राहुल गांधी यांनाही पाठवला आहे. सूरज ठाकूर हा युवा काँग्रेसचा एक आक्रमक तसेच मुंबईतील उत्तर भारतीय काँग्रेसचा प्रमूख चेहरा म्हणून ओळखला जातो. 14 वर्षांची मेहनत पक्षाने दूर्लक्षीत केली. ही बाब आपल्या मनाला लागल्यामुळे आपण राजीनामा दिल्याचे सूरज ठाकूर यांचे म्हणने आहे. दरम्यान, आपण राजीनामा दिला असला तरी पक्षासाठी काम करत राहू असेही सूरज ठाकूर यांनी म्हटले आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    राष्ट्रवादीला स्वत:चा गड राखण्यासाठी शिवसेनेचा उमेदव...

    June 4th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई :- राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार आहे. आपल्या ऐकण्यात नसेल इतकी किंमत असेल, महाराष्ट्राची जनता हे...

    बीडमध्ये कॉंग्रेसला धक्का ! मोदींचा राष्ट्रवादीत प्रवेश

    October 21st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबीडमध्ये कॉंग्रेसला धक्का बसल्याचे वृत्त समोर आले आहे. तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी राष्ट्रवाद...

    विजय वडेट्टीवारांच्या हस्ते चंद्रपूर जिल्ह्यात ‘समस्...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या...