कोकणातील सिंधुदुर्गमध्ये जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनाशीर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी ही जमाव बंदी लागू केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राणेंच्या यात्रेसाठी जमाव बंदी लागू करण्यात आली नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. तसेच राणे यांच्या यात्रेमुळे मी जमाव बंदीचे आदेश दिले हे सिद्ध झाल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
पंतप्रधान मोदींनी केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपकडून देशभर जनाशीर्वाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनाशीर्वाद यात्रा उद्यापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री उदय सामंत देखील आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की,’कोणाचा तरी दौरा आहे म्हणून आहे म्हणून मी रत्नागिरी दौऱ्यावर आहे, असे काही नाही, तो केवळ योगायोग समजावा. मागील तीन दिवस मी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या वेळापत्रकाला अनुसरून आम्ही दौरे लावले नाही.’ असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जन आशिर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमाव बंदी लागू केल्याचा आरोपाविषयी सामंत म्हणाले की, ‘भाजपाने खोटे आरोप केले आहेत. याचे पुरावे सिद्ध झाल्यास मी राजकीय सन्यास घेईल. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना स्वायत: अधिकार आहेत ते प्रशासनाचे प्रमुख आहेत. जिल्हादंडाधिकारी देखील आहे, त्यामुळे त्यांना वाटले असेल की कलम १४४ सिंधुदुर्गमध्ये लावणे आवश्यक आहे.