1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

शहिद सैनिकांसाठी अर्ध्यावर उतरविला अमेरिकेचा राष्ट्रध्वज

america
Spread the love

अफगाणिस्थान मधील काबुल विमानतळाबाहेर गुरुवारी झालेल्या आत्मघाती स्फोटात किमान ७२ मृत्यू झाले असून त्यात १३ अमेरिकन नौसैनिक शहीद झाले आहेत तर अन्य १८ जखमी झाले आहेत. सैनिकांशिवाय १४३ अन्य जखमी झाले आहेत. या शहीद सैनिकांच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवासावरील म्हणजे व्हाईट हाउस वरील राष्ट्रध्वज ३० ऑगस्ट पर्यंत अर्ध्यावर उतरविला गेला आहे. काबुल विमानतळा बाहेरच्या हल्ल्याची जबाबदारी इसीसने स्वीकारली आहे. दरम्यान या हल्ल्यातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इसीसने त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा दिला आहे. बायडेन म्हणाले आमच्या सैनिकांचा जीव घेणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना शोधून ठार करू. त्यांना किंमत चुकवावी लागेल. आम्ही ही जखम विसरणार नाही. विशेष म्हणजे ट्रम्प प्रशासन काळात तालिबानबरोबर झालेल्या चर्चेत तालिबानने अफगाणीस्थानला दहशतवादी अड्डा बनवू नये यावर सहमती होती. पण काबुल स्फोटानंतर तालिबानींचा उद्देश स्पष्ट झाला आहे.

यातील पहिला स्फोट ऐबी गेटबाहेर करण्यात आला होता. तेथे ब्रिटीश आणि अमेरिकी सैनिक तैनात होते. दुसरा स्फोट बॅरल हॉटेल बाहेर झाला. या हल्ल्यात इसीसने प्रामुख्याने सैनिकांना टार्गेट केले होते. त्यामुळे अफगाणिस्थान मध्ये पुन्हा अमेरिका सक्रीय होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रोमच्या ट्रेवी फौंटनमध्ये मोदींसह अन्य देश प्रमुखां...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी २० शिखर परिषदेत सामील होण्यासाठी इटली दौ-यावर गेले आहेत. रविवारी मोदी यां...

    काबूलच्या महिलांनी निषेधाचा मार्ग बदलला

    January 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरात्री शहराच्या भिंतींवर लिहिल्या मागण्या काबुल: अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत परतल्यानंतर आंदोलन करणाऱ्या म...

    समीर वानखेडेच्या अडचणीत वाढ होण्यास ‘ही’...

    May 28th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveशाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला केंद्रीय एजन्सीच्या विशेष तपास पथकाने अंमली पदार्थ प्रकरणी क्लीन चिट दिल्...