अफगाणिस्तानातून पळून जाण्याच्या आशेने इस्लामिक स्टेटच्या आत्मघाती हल्लेखोरांनी गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर जमलेल्या लोकांच्या जमावावर हल्ला केला, ज्यात १३ अमेरिकन सैनिकांसह अनेक नागरिक देखील ठार झाले. याविषयी अध्यक्ष जो बिडेन ह्यांनी या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेण्याचे वचन दिले आहे.
अफगाण सहयोगी, पार्टनर्स यांच्या साहाय्याने अफगाणिस्तानातील लॊकांच्या सुरक्षित स्थलांतर करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करणार आहोत, अफगाण लोकांना अमेरिकेबरोबरच्या संबंधामुळे लक्ष्य केले जाऊ शकते, असे, अध्यक्ष जो बिडेन म्हणाले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे काळजीवाहून राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी एक ट्विट केलं आहे.
यामध्ये तालिबानींनी त्यांच्या मास्टरकडून चांगले शिक्षण घेतले आहे असं म्हटलं आहे.अमरुल्ला सालेह म्हणाले की, तालिबानी मास्टर कडून चांगले शिकले.
पाकिस्तानचे क्वेट्टा शुरावेळी असलेले संबंध फेटाळले तसेच तालिबानने आता इसिसशी संबंध नाकारले आहेत.
हातात असलेला प्रत्येक पुरावा हा IS-K ची पाळेमुळे ही तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमध्ये असल्याचं दाखवतं.
अमरुल्ला सालेह यांनी याआधी तालिबानला विरोध सुरुच राहणार असल्याचं म्हटलं होतं.
अफगाणिस्तानचे सरकार म्हणून तालिबानला कधीच मान्यता देणार नाही. अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली इतर बाबींवर चर्चेसाठी तयार आहे. मात्र शरणागती पत्करणार नाही असेही त्यांनी सांगितलं होतं.
तालिबानने अफगाणिस्थान ताब्यत घेतल्यापासून आणि १५ ऑगस्ट रोजी सत्तेवर आल्यापासून १,००,००० हून अधिक लोकांनी अफगाणिस्तानातूनपळ काढला आहे.
अफगाणिस्तानत आता कट्टरपंथी इस्लामवाद्यांचे कायदेकानून तसेच भयभीत कट्टर राजवटीपासून वाचण्यासाठी हताश हुन अफगाणीस्थान सोडत आहेत.
अमेरिकेने त्यांच्या सैनिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर तालिबानला इशारा दिला आहे.
तालिबानला याची किंमत मोजावी लागेल आणि आम्ही तुम्हाला शोधून मारू असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटलं आहे.
अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली असून ३० ऑगस्टपर्यंत अमेरिकेचा झेंडा अर्ध्यावर फडकणार आहे.