टोमॅटोला भाव मिळत नसल्याने राज्यात शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकत आहेत. टोमॅटो खरेदीवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरु आहे. टोमॅटोची निर्यात सुरूच आहे. या शिवाय आता एमआयएस योजनेंतर्गत राज्य सरकारनं टोमॅटोची खरेदी करावी आणि त्याची विक्री करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे आवाहन केंद्रीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले आहे.
डॉ. भारती पवार म्हणाल्या की, दोन वर्षे सातत्याने ज्या प्रमाणे दर भेटला त्याच पार्श्वभूमीवर केंद्र आजही निर्यात खुली करण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र कोरोना आणि इतर देशांत मागणी नसल्याने निर्यात अधिक खुली कशी करता येईल, याबाबत काम करत आहोत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. मागील दोन वर्षा प्रमाणे यावर्षी देखील जास्त भाव कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक मध्ये टोमॅटोचे भाव कोसळले असताना राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून मविआ सरकार फायटर असल्यासारखं राज्यामध्ये काम करत आहे ही बाब अतिशय निंदनीय आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या.
सध्याची टोमॅटोची आवक बघता मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकाचे उत्पादन झाले असून टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने बाजारभाव पडले आहे. ह्याकरिता तात्काळ दखल घेत डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल व कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी संपर्क साधत हे कोसळलेले बाजारभाव बघता टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ नये म्हणून त्वरित पत्रव्यवहार केला तसेच फोन वर संभाषण केले असता टोमॅटो निर्यातीवर कुठलेही बंधन नसून निर्यात खुली आहे असे संबंधित मंत्र्यांनी सांगितले, असेही त्या म्हणाल्या.
शेतकरी उत्पादकांनी घेतलेल्या टोमॅटो पिकाची उत्पादन खर्चा पेक्षा कमी विक्री होत असेल तर मार्केट इंटरवेनशन स्कीम (MIS ) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळू शकते आणि ह्याच स्कीमच्या माध्यमातून राज्यसरकारने जर मागणी केली तर केंद्रसरकार 50% तोटा सहन करून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तयार असल्याचे केंद्रीय मंत्री यांनी सांगितले.
तसे पत्र पण केंद्राने राज्यसरकारला पाठवले असल्याचे सांगितले, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली.
आता यासाठी राज्यसरकारने त्वरित केंद्राकडे मागणी केल्यास केंद्र सरकार निश्चितच अडचणीत आलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यास मदत करेल.
टोमॅटोचे बाजारभाव कमी झाल्याची तात्काळ दखल केंद्र सरकारने घेतल्या बद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषिमंत्री तोमर यांचे डॉ. भारती पवार यांनी आभार मानले आहे.