1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

आसाम येथील पूरस्थिती गंभीर ; ७३२ गावे पाण्याखाली

flood
Spread the love

आसाम येथील पूरची स्थिती भयावह झाली आहे. यंदा आसाम येथे पावसाळा हा तीन महिने उशीरा सुरु झाला.

एकूण १६ जिल्ह्यातून २.५८ लाख लोक या पुरामुळे प्रभावित झाले, असे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सांगितले.

कामरूप येथील पानीखैती गावात पूरग्रस्त स्थितीमुळे घर पाण्याखाली आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे यात नुकसान झाले आहे.

लखीमपूर येथे १.०५ लाख लोक तर माजुली येथे ५७,२०० पेक्षा अधिक, धेमाजी येथे जवळजवळ ३५,५०० लोक पुरामुळे पुरामुळे प्रभावित झाले. एएसडीएमएने सांगितले की, सध्या ७३२ गावे पाण्याखाली गेली आहेत आणि संपूर्ण आसाममध्ये २४.७०४. ८६ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

मदत कार्य येथे चालले आहे. आतापर्यंत ६,२१८ लोकांचे स्थानांतर २४ रिलीफ कॅम्पमध्ये करण्यात आले आहे.

स्थानिक रहिवासी कमला सांगतात की, ‘सुमारे तीन दिवसांपूर्वी पुराचे पाणी माझ्या घरात शिरले.

माझी मुले अभ्यास करू शकत नाहीत. जेवणाची व्यवस्था नाही.

मी या अशा परिस्थितीत कशी राहील? आणखी एक स्थानिक रहिवासी अली सांगतात की, २०० हून अधिक घरे पुरामध्ये पाण्याखाली गेली आहेत.

आतापर्यंत कोणीही आमच्या मदतीला आले नाही.

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. आसाममध्ये लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

ब्रह्मपुत्रा नदीची धोक्याची पातळी ओलांडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    15 वर्षांखालील मुलांना लस देण्याची भारताची योजना नाही

    December 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतात, 3 जानेवारीपासून, 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोना साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी लस देण्यास सुरुव...

    बाळासाहेब ठाकरे नसते; तर मोदींचे अस्तित्व केव्हाच सं...

    October 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र शिवसेना-भाजपमधील वाकयुद्ध शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यानंतर सुरुच आहे. दोन्ह...

    मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता ...

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveशिवसेनेचा सामन्यातून टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख...