1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करावे; सतेज पाटील

satej patil2
Spread the love

राज्यात कोरोनाची तिसरी लाट 15 ऑक्टोबरपर्यंत डोकं वर काढू शकेल असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे समजते. त्या दृष्टीने आत्तापासून आरोग्य विभागाने ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करावे असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी पालकमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, आरोग्य विभागाने दुसऱ्या लाटेचे अचुक विश्लेषण करावे. जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी याचा उपयोग होवू शकेल. हॉस्पिटलचे बेड मॅनेटमेंट (खाट व्यवस्थापन) जिल्हा प्रशासनाने स्वत:च्या ताब्यात ठेवावे. कोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑक्सीजन प्लॅन्टची उभारणी पूर्णत्वाकडे जात असल्याने ऑक्सीजनबाबत कोल्हापूर जिल्हा लवकरच स्वंयपूर्ण होईल असा आशावाद व्यक्त करुन चंदगड आणि गारगोटीला ऑक्सीजन प्लॅन्ट तयार करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मनुष्यबळाबाबत आपण स्वत: आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांशी बोलणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलाचा (खासगी रुग्णालय) सपोर्ट घ्या. 7 ऑक्टोबरपूर्वी आरोग्य विभागाने याची संपूर्ण तयारी करावी तसेच व्हॅक्सीनेशनबाबत काही अडचण येत असल्यास जिल्हा प्रशासनाला कळविण्यात यावे. इन्फ्रास्टक्यरसह आरोग्य विभागाने प्लॅनिंग करावे. तसेच खासगी रुग्णालयाला DCH, CCC मध्ये कनव्हर्ट करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या बैठकीत दिल्या.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सोमय्यावरील कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा संबंध न...

    September 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईशी मुख्यमंत्री कार्यालयाचा काडीचाही संबंध नाही. ही ...

    अंगणवाडी सेविकांना दोन हजार रूपयांची भाऊबीज भेट – मह...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना भा...

    सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मनुष्याकडून घृणास्पद प्रकार

    April 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकोल्हापूर येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे येथे एक किसळवाणा प्रकार उघडकीस आला आहे. विनापरवाना शस्त...