महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तोंडी शिक्षकांविषयी अनुदार उद्गार घालून खोटी बातमी देणार्या औरंगाबाद येथील लोकपत्र दैनिकाचा भामटा संपादक ‘रविंद्र तहकिक’ याच्या विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात काल रात्री उशारा गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पठाडे यांनी हा गुन्हा दाखल केला असून भारतीय दंड विधान चे कलम 153 अ (1)(ब)(क) तसेच 504, 504(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांतर्गत आरोपीला 3 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. मुरदाडकीचा नमुना असलेल्या या संपादकास यापूर्वीही शिक्षकानी चोप दिलेला आहे.
तथ्य नसलेल्या आणि काल्पनिक बेबनाव करून वृत्त छापून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची बदनामी करणे, शिक्षक वर्गाला ज्येष्ठ समाजसेवकाच्या विरोधात चिथावणी देणे आणि शिक्षक वर्ग व अण्णा समर्थक अशा दोन समुदायात तेढ निर्माण होईल असे कृत्य करून सामाजिक शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संपूर्ण घटनेचा तपास पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळप साहेब हे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील व उप अधीक्षक पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असल्याचे समजते.