महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी थेट राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाना साधला आहे. विजय वडेट्टीवार जातीयवादी असून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.
तसेच आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेला मागासवर्गीय आयोगही जातीवाद करत असून हा आयोगही बरखास्त करण्यात यावा. अशी मागणीही विनायक मेटे यांनी केली आहे.
दरम्यान त्यांनी जर शासनाने आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर २३ तारखेपासून अहमदनगर शहरात आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.