1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जगातील सर्वाधिक सुरक्षित शहराच्या यादीत ‘महाराष्ट्र’ही

EIU
Spread the love

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी समोर आली असून या यादीत भारतातील दोन शहरांचा समावेश आहे. तर, डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने हे सर्वेक्षण केलं होतं. जगभरातल्या ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. सुरक्षित शहरं निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. यामध्ये डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि संबंधित शहरात माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या सर्व गोष्टींचा समावेश होता.

भारताची राजधानी दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबईचे या यादीत नाव आहे. यामध्ये दिल्ली ६० पैकी ४८व्या क्रमांकावर तर मुंबई ५०व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध ही दोन शहरं आहेत. मुंबई दिल्लीपेक्षा जास्त सुरक्षित असल्याचं म्हटलं जातं तरीही वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे. तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर आहे.

डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन १०० पैकी ८२.४ पॉइंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. कोपेनहेगनने टोक्यो आणि सिंगापूरसारख्या शहरांना मागे टाकत सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. दुसऱ्या क्रमांकावर कॅनडाची राजधानी टोरंटो आहे. टोरंटोला ८२.२ पॉइंट्स मिळाले आहेत. टोरंटो हे वैविध्यपूर्ण शहर असून इथली जवळपास ३० लाख लोक १८० भाषा बोलतात. उन्हाळा आवडणाऱ्यांसाठी तर टोरंटो नंदनवन आहे. तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर शहर आहे. शहराची दुसऱ्या क्रमांवरून तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. करोनाचा सिंगापूर शहराला मोठा फटका बसला असला तरी हे शहर पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलंय. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी आहे. सिडनीला ८०.१ पॉइंट्स मिळाले आहेत. सिडनी हे जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक असून खाद्यप्रेमींसाठी पर्वणी आहे. तर पाचव्या क्रमांकावर जपानची राजधानी टोक्यो शहर आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाबरिया यांन...

    April 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई – रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाबरिया यांना येस बँक-डीएचएफएल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणा...

    शरद पवारांसह प्रफुल्ल पटेल मुंबईतील सर्व कार्यक्रम र...

    November 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलदे...

    पिंपरीतील भुजबळ चौकातून 7 लाख किंमतीचा 30किलो गांजा ...

    November 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगुन्हेगारीसाठी घटनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 7 लाखाहून अधिक किंमतीचा 30 किलो गांजा प...