1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

‘कोरोनासह ईडा पीडा घेऊन जा गे मारबत…. ‘ नागपुरात मारबत- बडग्या उत्सहास प्रारंभ

marbat
Spread the love

उपराजधानीतील बडग्या-मारबत महोत्सवाला प्रारंभ झाला असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. पिवळी मारबत उत्सव गेल्या 137 वर्षांपासूनच अविरत साजरा करण्यात येतो तर काळ्या मारबतीलाही 141 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा आहे. काळी आणि पिवळी मारबत सध्या विराजमान झाल्या असून त्यांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी उसळली आहे.

बैल-पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तान्हा पोळ्याला मारबत बडग्याच्या मिरवणुकी शहरातून काढली जाते. या अभिनव प्रथेच्या माध्यमातून वर्षभर देशात घडलेल्या चांगल्या-वाईट घटनांवर भाष्य करणारे बडगे तयार केली जातात. देशात एकमात्र नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी मारबत मिरवणूक काढली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.काळ्या आणि पिवळ्या मारबतीचे महत्त्व धावपळीच्या या युगात आपल्याला आपल्याच संस्कृतीचा विसर पडत असताना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने 137 आणि 141 वर्षे जुन्या ऐतिहासिक परंपरेचे जतन केले आहे. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काळी आणि पिवळी मारबतीसह बडगे तयार केले जातात. मारबत म्हणजे वाईट रुढी-परंपरा, अंधश्रद्धेच दहन करणे आणि चांगल्या परंपरा, विचारांचे स्वागत करणे. महाभारताचा संदर्भही या उत्सवाला दिला जातो. कृष्णाच्या वध करण्यासाठी आलेल्या पुतना मावशी प्रतीक काळी मारबत आणि लोकांचे रक्षण करणारी पिवळी मारबत, अशा दोन विशाल मूर्ती तयार केल्या जातात.

लोकांना एकत्र करण्याचा मुख्य हेतू

इंग्रजांच्या काळात देशात नागरिकांना एकत्र येण्यासाठी नागपूर येथे मारबत उत्सव सुरू करण्यात आला. गणेशोत्सवापेक्षाही जुना उत्सव मारबत आहे. प्राचीन काळात अनेक रुढी, परंपरा होत्या. ज्या मानव जातीसाठी घातक ठरत होत्या. त्यांचे प्रतीक म्हणजे काळी मारबत. तर ज्या चांगल्या परंपरा आहे त्याचे प्रतीक म्हणजे पिवळी मारबत. वाईट परंपरा, रोगराई, संकट समाजातून नष्ट व्हावे. चांगल्या गोष्टींचे स्वागत करण्यासाठी ही मारबत उत्सव साजरा केला जातो. गेल्या 137 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढली जाते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अटकपूर्व जामीन मंजूर; गजानन काळेंना न्यायालयाचा दिलासा

    September 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नेरुळ पोलीस ठाण्यात गजान...

    एसटी कर्मचा-यावर मेस्मा कारवाई होणार

    December 4th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveलालपरीचा संप मिटल्यात जमा एसटी कर्मचाऱ्यांचे सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या 25 दिवसांपासून कर्म...

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नागपूर सज...

    September 21st, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूरला आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटांचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सावध राहायला ...