नागपुरात कोरोना महामारीची तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर राज्यात कोरोना निर्बंधात सूट देण्यात आली होती.
पण आता परत तासली लाट येण्याचे संकेत दिसून येत आहे.
त्यामुळे राज्यात येत्या दोन-तीन दिवसात पुन्हा निर्बंध लावले जाऊ शकतात असे नितीन राऊत म्हणालेत.
“रुग्णांची संख्या वाढते तेव्हा लाट येण्याची शक्यता असते.
कोरोनाची आकडेवारी लक्षात घेता शहरामध्ये आणि ग्राम भागांमध्ये पुन्हा निर्बंध लाववे लागणार आहेत.
आतापर्यंत कोरोना रुग्णांची आकडेवारी एकेरी होती आता मात्र दुहेरी आकड्यांची झाली आहे.
सोमवारी नागपुरात पॉसिटीव्ह कोरोना रुग्णांची संख्या १३ होती . तिसऱ्या लाटेने आपल पाऊल जिल्ह्यामध्ये टाकले आहे. त्यामुळे याविषयीचे कडक निर्णय आम्हाला घ्यावे लागतील”, असे नितीन राऊत म्हणालेत.
नागपुरात कसे असेल निर्बंधाचे स्वरूप जाणून घ्या :-
हॉटेलच्या वेळा रात्री आठ वाजेपर्यंत कारणात येतील. तसेच दुकानाच्या वेळा दुपारी चार वाजेपर्यंत करण्यात येतील, असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहरात सोमवारी दहा नवीन कोरोना रुग्नांची नोंद झाली आणि शून्य मृत्यूची नोंदी झाली. साध्य स्थिस्तीत नागपुरात ५६ एकूण सक्रिय रुग्ण आहेत.