काबूलमध्ये पाकिस्तानविरोधी रॅलीमध्ये तालिबान्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. अहवालानुसार, सुमारे 70 महिला आणि पुरुष पाकिस्तान दूतावासाबाहेर निदर्शने करत होते. हातात फलक घेऊन हे लोक घोषणा देत होते. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
मात्र, पाकिस्तानविरोधी आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलकाचा मृत्यू किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. वास्तविक, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचे प्रमुख फैज हमीद यांनी अलीकडेच काबूलला भेट दिली होती. अहवालांनुसार, नवीन सरकारबाबत तालिबान नेत्यांमध्ये मतभेद असताना हमीदची भेट झाली. असे मानले जाते की पाकिस्तानच्या सांगण्यावरुन तालिबानमधील कमी नेत्याला कमान सोपवली जाऊ शकते. या कयासा दरम्यान गोळीबाराची ही घटना घडली आहे.