जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना प्रशासनाने त्यांच्या श्रीनगर येथील निवासस्थानी पुन्हा नजरकैदेत ठेवले आहे. मुफ्ती मंगळवारी शेर-ए-काश्मीरमधील त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयाला भेट देणार होते.
माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वत: च्या अटकेबद्दल केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हटले की, हे जम्मू-काश्मीर मधील सामान्य स्थितीचे दावे पूर्णत:हा खोटे आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरद्वारे म्हटले की, “भारत सरकार अफगाण लोकांच्या हक्कांबद्दल चिंता व्यक्त करते, परंतु मुद्दाम काश्मिरींना या अधिकारांपासून वंचित ठेवते. मला आज नजरकैदेत ठेवण्यात आले आहे कारण प्रशासनाच्या मते काश्मीरमधील परिस्थिती सामान्य नाही. हे सामान्य स्थिती सांगण्याचे दावे उघड करतात. ”
सोमवारी मेहबूबा मुफ्ती यांनी फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्या कुटुंबाला अंतिम संस्कार करण्यासाठी नाकारल्याबद्दल सरकारवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, हे मानवतेच्या विरोधात असून जम्मू -काश्मीरच्या नागरिकांची कुचंबना करण्यात येत आहे. गिलानी यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळील मशिदीच्या परिसरातील स्मशानभूमीत दफण करण्यात आला.
दरम्यान, मेहबूबा पक्षाच्या बैठकीनंतर म्हणाल्या, “गिलानी यांच्याशी आमचे मतभेद होते … लढाई एका जिवंत व्यक्तीशी लढली जाते परंतु जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीसोबत असणारे मतभेद तिथेच संपले पाहिजेत. मृत व्यक्ती सम्मानजनक अंत्यसंस्कारास पात्र असते. माजी मुख्यमंत्री म्हणाले की, गिलानी यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अंतिम संस्कार करण्यास नकार दिल्याने जम्मू -काश्मीरमधील लोकांना दुःख झाले आहे. “मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार करण्याचा अधिकार कुटुंबाला आहे. प्रसारमाध्यमांच्या अहवालांद्वारे आपण मृतांविषयी अनादर केल्याबद्दल जे ऐकले ते मानवतेच्या विरोधात आहे. मृत्यूनंतर तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्याचाही आदर करावा लागतो जसे तुम्ही इतर व्यक्तींचा आदर करता.