1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अफगाणिस्थानात राष्ट्रपती व मंत्री घेतात एवढा पगार

mullah hasan akhund
Spread the love

तालिबानने अफगाणिस्थान मध्ये सरकार स्थापन केले असून पंतप्रधानपदी मोहम्मद हसन अखुंद यांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर ३३ सदस्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले जात आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या तालिबान सरकार मधील पंतप्रधान, मंत्री आणि इतर प्रमुख सदस्य किती पगार घेतील याची अनेकांना उत्सुकता आहे. अर्थात या संदर्भात अजून कोणतीही घोषणा झालेली नसली तरी मागच्या सरकार वरून त्याचा अंदाज बांधला जात आहे. मागच्या सरकारमध्ये प्रमुख पद राष्ट्रपती हे होते. अशरफ गनी देशाचे राष्ट्रपती होते आणि त्यांचा पगार होता महिना १३४०० डॉलर्स. म्हणजे ११.५ लाख रुपये. भारताच्या राष्ट्रपतीच्या तुलनेत हा पगार खूपच जास्त होता. भारताच्या राष्ट्रपतींचा पगार आहे महिना ५ लाख रुपये.

भारताच्या तुलनेत अफगाणिस्थानचे मंत्री आणि सरकारी अधिकारी यांचे पगार जास्तच होते. शिवाय भारताच्या तुलनेत अफगाणिस्थान मध्ये खाणे पिणे खर्च स्वस्त होता. अशरफ गनी २०१४ पासून राष्ट्रपती होते आणि आशियातील सर्वाधिक पगार व सुखसुविधा घेणारे म्हणून ओळखले जात होते. तालिबानी आल्यावर त्यांनी देश सोडून पलायन केले आहे. असे म्हणतात की तालिबानी पंतप्रधान अखुंद महिना १० ते ११ लाख रुपये पगार घेतील.

अफगाणिस्थानचे माजी उपराष्ट्रपती सालाह याना महिना ९ लाख ६० हजार वेतन होते. तालिबान सरकार मध्ये दोन उपपंतप्रधान आहेत. त्यांना ८ लाख १९ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. अफगाणिस्थानच्या वरिष्ठ सभागृहात १०२ तर कनिष्ठ सभागृहात २५० सदस्य आहेत. त्यांना सरासरी दीड लाख रुपये पगार दिला जात होता. तसाच पगार तालिबानी सदस्यांना दिला जाईल असे मानले जात आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अमेझॉनचे मालक ‘जेफ बेजोस’ उभारणार खाजगी ...

    October 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी पहिले खाजगी अंतराळ केंद्र उभारण्या...

    अफगाणिस्तानात सत्ता स्थापनेच्या हालचालीस वेग

    September 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveअफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग आलाय. तालिबानने सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंड...

    टाइम मॅगझिनने केली जगातील प्रभावशाली व्यक्तींची यादी...

    September 16th, 2021 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveपंतप्रधान नरेंद्र मोदी, बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी आणि भारताच्या सिरम इंस्टीट्युटचे सीइओ अदर पुनाव...