1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

किरीट सोमय्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार; हसन मुश्रीफ

hasan mushrif
Spread the love

भाजप नेते किरीट सोमय्या सध्या महाविकास आघाडी सरकारवर थेट हल्ला करत आहेत. अजून एका मंत्र्यांचं नाव बाहेर काढणार असं म्हणत किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. दरम्यान त्यावर आता हसन मुश्रीफ यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?

किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवार साहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत. असं मंत्री मुश्रीफ म्हणाले.

तसेचं मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती . या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले. मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार. असल्याचं यावेळी मश्रीफांनी सांगितलं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अधिवेशनात घुसलाय कोरोना; मंत्र्यासह ३५ जण बाधित

    December 27th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्द्यावरून सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. देशात ओमिक्रॉनचं संक...

    आश्चर्यम…!! फरार परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा ग...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईचे माजी पोलीस आयुक्त मागील अनेक दिवसांपासून फरार आहेत. त्यांचा अटक वारंट महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तच...

    वॉर्ड पुनर्रचना करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा र...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेशपातळीवर जातीय जनगणना करण्यास मोदी सरकार चालढकल करीत असल्याने वाद निर्माण झालेला आहे. त्यात कोरोनाच्या प्...