जेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. तर 18 विद्यार्थ्यांना नंबर वन रँक मिळाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अथर्व अभिजीत तांबट या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांना आपली गुणसंख्या सुधारण्याची संधी मिळावी यासाठी यावर्षी जेईई-मेनची परीक्षा वर्षातून चार वेळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिलं सत्र फेब्रुवारी आणि दुसरं मार्च महिन्यात आयोजित करण्यात आलं होतं. पुढील सत्राच्या परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यात होणार होत्या. मात्र देशात करोनाची दुसरी लाट आल्याने त्या स्थगित करण्यात आल्या होता. तिसरं सत्र 20-25 जुलैला आयोजित करण्यात आलं होतं, तर चौथं सत्र 26 ऑगस्ट ते 2 डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं.