देशातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण झाल्याने ते आता सक्रीय झाले आहेत. याचबरोबर जुना चेक, IFSC कोड आणि बँकेचा MICR कोड देखील बदलला आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जुन्या चेकने व्यवहार करत असाल तर तो चेक बाउन्स होऊ शकते.
जर तुम्ही जुन्या IFSC कोडचा वापर करून नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार करत असाल तर हा व्यवहार अयशस्वी होऊ शकतो. दरम्यान तीन बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. १ ऑक्टोबरपासून हे जुने चेकबुक अवैध ठरू शकते. १५ दिवसांनंतर म्हणजे ३० सप्टेंबर पासून, अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँकआणि युनायटेड बँक ऑफ इंडियाची जुनी चेकबुक अवैध ठरणार आहेत.
ओरिएंटल आणि युनायटेड बँकेचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झाले असल्याची माहिती आहे. बँकाच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर सुमारे दोन वर्षांत कार्यवाही सुरू झाली आहे. अलाहाबाद बँकेचा MICR कोड आणि चेक बुक फक्त ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध आहे. जुना MICR कोड आणि चेक बुक १ ऑक्टोबर २०२१ पासून अवैध होईल. त्यामुळे बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी नवीन चेकबुक घ्यावे.
ग्राहक स्वतःच बँक शाखेला भेट देऊन चेकबुक घेऊ शकतात किंवा ते ऑनलाईन मागणी करू शकतात. पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) माहितीनुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँकेची जुनी चेकबुक ३० सप्टेंबरनंतर अवैध होतील. १ ऑक्टोबर २०२१ पूर्वी ग्राहकांना नवीन चेक बूक मिळवावे लागेल.
ग्राहकांना विनंती करण्यात आली आहे की या दोन बँकांचे जुने चेक बूक बदलून नवीन चेकबुकसह IFSC कोड आणि PNB चा MICR कोड घेण्यात यावा असे सांगण्यात आले. चेकबुकसाठी इंटरनेट बँकिंग किंवा पीएनबी वन सेवेचा उपयोग करण्याचे आवाहन पंजाब नॅशनल बँकेकडून करण्यात आले आहे.