ऑगस्ट २०१९ च्या शासन परिपत्रकानुसार DCPS रकमेच्या १४% शासन हिस्सा जमा करण्याबाबत मागणी जुनी पेंशन हक्क संघटन वर्धा येथील शिष्टमंडळाने जून महिन्यातील भेटीदरम्यान केली असता त्या संबंधाने प्रशासनाने शासनाशी पत्रव्यवहार करून सादर रक्कम मागविल्याचे पत्र प्रदर्शित केले असतांना त्या पत्रामध्ये मागविलेली रक्कम ही १०% ने असून ऑगष्ट १९ च्या संदर्भित शासन परिपत्रकाप्रमाणे १४% शासन हिस्सा व त्यावरील व्याजाची रक्कमेची मागणी करण्यात यावी ही महत्त्वाची बाब यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वर्धा यांचे लक्षात आणून निवेदन सादर करण्यात आले.
NPS धारकांचा DCPS योजनेतील Closing Balance रकमेचा NPS योजनेत Opening Balance या शीर्षा खाली रक्कम वर्ग करावी.या मागणी नुसार शासनाकडून थकीत रक्कम प्राप्त होताच हा प्रश्न निकाली काढण्यात येईल याची ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. आर्थिक वर्ष २०-२१ अंतर्गत माहे-एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये वेतनातून कपात झालेल्या DCPS रक्कमेची विवरणपत्र अदा करणे बाबत विचारणा केली असता या महिण्याखेरीस विवरणपत्र वितरित करण्याचे निर्देश मा. मुख्य लेख तथा वित्त अधिकारी यांनी संबंधितांना दिले.
NPS योजने अंतर्गत शिक्षकांची नवीन खाती उघडण्याच्या प्रयत्नात प्रशासनिक तांत्रिक चूकीमुळे प्राप्त झालेले PRAN नंबर सदोष असून ते नव्याने प्राप्त करण्याचा प्रयत्नात पत्रव्यवहार सुरू असल्याचे मा.अधिकारी महोदयांनी कळविले. तद्वतच योग्य व परिपूर्ण प्राण किट उपलब्ध झाल्याबरोबर वरिष्ठ आदेशाप्रमाणे संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांची DCPS रक्कम वर्ग करण्यास प्रथम प्राधान्य देऊ असे अधिकारी महोदयांनी स्पष्ट केले.
२००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्याना सातव्या वेतन आयोगातील फरकाचा रकमेचा दुसरा हफ्ता सप्टेंबर पेड इन आक्टोबर वेतनात देय असल्या कारणाने त्यासंबंधाने आज दिनांक १७ पर्यंत अनुदान अप्राप्त असल्याचे कार्यलयाकडून माहिती देण्यात आली. फेब्रुवारी 2009 मध्ये लागलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे चटोपाध्याय प्रस्ताव संबंधी चर्चा करण्यात आली, यावेळी माननीय शिक्षणाधिकारी साहेब यांनी प्रस्ताव मागविण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे कळविले.
उपरोक्त सर्व विषयामध्ये समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून प्राप्त झाल्याचे मा.जिल्हाध्यक्ष प्रफुल कांबळे यांनी सांगितले.या वेळी राज्य संपर्क प्रमुख सुशिल गायकवाड, विभागीय सचिव हेमंत पारधी,जिल्हा सचिव प्रमोद खोडे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन शंभरकर, कार्याध्यक्ष कृष्णा तिमासे,कार्या.चिटणीस मनोज पालिवाल,प्रसिद्धी प्रमुख आशिष बोटरे,समुद्रपूर तालुकध्यक्ष समीर वाघमारे हे उपस्थित होते.