1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

Google विकणार Potato Chips; पॅकेटवर खास तुमचं नाव लिहिण्याचीही देत आहे संधी

google chips
Spread the love

प्रसिद्ध टेक फर्म गुगल (Google) लवकरच पुढील फ्लॅगशिप फोन Pixel 6 लाँच करणार आहे. पिक्सेल 6 ची छायाचित्रं आधीच समोर आली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का की, आता कंपनी गुगल ओरिजिनल चिप्सही विकत आहे? वास्तविक गुगलनं प्रथमच स्मार्टफोन चिपसेट सादर केला आहे. त्याचे नाव टेन्सर आहे आणि आता हाच चिपसेट पिक्सेल 6 या मोबाईल फोन सीरिजमध्ये दिसेल.

काय आहे चिप्स प्रकरण?

खरं तर चिप आणि चिप्समध्ये खूप फरक आहे. पण दोन्ही शब्द ऐकण्यात सारखेच वाटतात. याचा लाभ घेण्याची कंपनीची तयारी आहे. गुगलच्या पिक्सेल 6 मालिकेत एक नवीन चिपसेट येणार आहे आणि कंपनीला त्यांच्या नवीन चिपसेटचा प्रचार करायचा आहे. म्हणूनच पिक्सेल 6 अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी गुगल ही युक्ती अवलंबत आहे. जपानमध्ये कंपनीनं पिक्सेल 6 च्या प्रमोशनसाठी गुगल ओरिजिनल चिप्स सादर केली आहे. हे बटाटा चिप्स आहेत. यांच्याद्वारे कंपनीनं त्याच्या टेन्सर चिपसेटची प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रचाराची सर्व तंत्रे

गुगलच्या ओरिजिनल चिप्सच्या पॅकेटला पिक्सेल 6 सीरीज सारखाच रंग ठेवण्यात आला आहे. मागील पॅनेल त्याच रंगाच्या डिझाइनमध्ये दिसेल. गुगलने पाच रंगांच्या पर्यायांसह चिप्सचे पॅकेट तयार केले आहे. कंपनीनं बटाटा चिप्सच्या 10 हजार पिशव्या बनवल्या आहेत. या भारतात उपलब्ध नाहीत. कारण, गुगल आपला नवीन पिक्सेल भारतात लाँच करणार नाही.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी

    December 17th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयुरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करणाऱ्या फायझरच्या को...

    Twitter ने ALT badges, image descriptions रोल आऊट केले

    April 9th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: या आठवड्याच्या सुरुवातीला, Twitter ने ALT badges आणले आणि जागतिक स्तरावर इमेज डिस्क्रिप्शन सर्वांसम...

    नागपुरात धावत्या मेट्रोत साजरा होणार ‘आंतरराष्...

    June 20th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरातुम नागपूर विद्यापीठाचा पुढाकार नागपूर : स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव, विद्यापीठाचा ऑगस्ट महिन्यात स...