उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे अखिल भारतीय आखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या सर्व परिस्थितीला पाहता, या प्रकरणात नवीन आरोपी समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी याना एका व्हिडिओ वरून ब्लॅकमेल केल्या जात होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करण्यासाठी एका सीडीचा वापर केला जात होता.
पोलिसांचे म्हणणे आहे की, मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी असेही सांगितले की महंत नरेंद्र गिरी आपल्या एका शिष्यावर नाराज होते. या प्रकरणी त्याचा एक शिष्य आनंद गिरी याला पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून ताब्यात घेतले आहे.
मात्र, नरेंद्र गिरी यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचा संशय प्रथम व्यक्त केला होता. परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की महंत नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी यांचे नाव लिहिले होते, त्यामुळेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी शोक व्यक्त केला आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.
अखिल भारतीय आखाडा परिषद ही भारतातील 13 आखाड्यांची संतांची संघटना आहे. ज्यामध्ये निर्मोही आखाडा देखील समाविष्ट आहे, ज्याने राम मंदिराच्या बांधकामात महत्वाची भूमिका बजावली आहे. नरेंद्र गिरी हे आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते, त्यामुळे प्रत्येकाला त्यांच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घ्यायचे आहे.