1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

डब्ल्यूएचओने मानले मनसुख मांडावीया यांचे आभार

WHO-T
Spread the love

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडावीया यांचे वर्ल्ड हेअल्थ ऑर्गनायझेशनच्या चीफ ने आभार मानले. भारताने पुढील महिन्यापासून अतिरिक्त लसींची निर्यात आणि लसीचा पुरवठा देणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

जगभरात भारताने एकूणच लसींची सर्वात मोठी निर्मिती केली आहे. याकरीता भारताला “फार्मसी ऑफ द वर्ल्ड” चे नामांकन मिळाले आहे. एप्रिलमध्ये लसींची निर्यात थांबवण्यात आली होती. जेणेकरून तिसरी लाट येण्याअगोदर जास्तीत जास्त भारतीयांच्या लसीकरण वर भर दिला जाईल. भारतीय लोकसंख्या लसीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या या मागचा उद्देश होता.

डब्ल्यूएचओ आणि जीएव्हीआय लस अलायन्स हे कॉव्हॅक्स सुविधेचे नेतृत्व करीत आहेत, ज्याचा उद्देश संपूर्ण जगभरात कोरोनाव्हायरस विरूद्ध लसी खरेदी आणि वितरीत करण्यात मदत करणे आहे. अमेरिकन एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) च्या प्रशासक समंथा पॉवर यांनी मे महिन्यात सांगितले होते की, भारतात कोरोना प्रकरणांचा उद्रेक झाल्यानंतर कोव्हॅक्सच्या जागतिक पुरवठ्याला मोठा धक्का बसला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंगळवारपासून वॉशिंग्टन दौऱ्यापूर्वी निर्यातीची चर्चा पुन्हा सुरू झाली, जिथे अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांच्या नेत्यांच्या शिखर परिषदेत लसींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. नवीन एक्स्पोर्ट ड्राईव्ह “व्हॅक्सिन मैत्री” च्या अंतर्गत हे जगभरातील कोवॅक्स लस पुरवठा प्लॅटफॉर्म असून लगतच्या देशांना लस पुरवठ्यात प्रधान्य दिले जाईल, असे मांडवीया यांनी म्हटले.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    नागपुरात होणार ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’; प...

    June 14th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन विद्युतीकरणासह डिजीटलायझेशन करुन ‘स्मार्ट पोलीस स्टेशन’ क...

    पंजाब विजयाचा ‘आप’ने केला नागपुरात जल्लोष

    March 11th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: आम आदमी पार्टीचा मोठा विजय पंजाब मध्ये झाला असल्यामुळे नागपूर मध्ये आम आदमी पार्टीने जल्लोष केला. य...

    उत्तर प्रदेश: निवडणुकीच्या रिंगणात अखिलेश यादव यांची...

    January 3rd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveपूर्वीच्या नकारघंटेला पूर्णविराम उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुक लढणार असल्याचे जाह...