पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि भारतीय वेळेनुसार ३.३० वाजता वॉशिंग्टन येथे पोहचले. मोदी हे तीन दिवसांच्या यात्रेवर आहेत. पंतप्रधान वॉशिंग्टन डीसीच्या ज्वाइंट बेस एंड्रयूज पोहचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अमेरिकेतील भारतीयांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. पाऊस सुरु असतांना देखील भारतीय मोठया संख्येने तेथे उपस्थित होते. मोदी यांच्या स्वागतासाठी एंड्रयूज ज्वाइंट एयरफोर्स बेस येथे जमा झाले होते.
२०१४ मध्ये पदभार सांभाळल्या नंतर सातव्यानंदा अमेरिकेच्या यात्रेवर गेले आहे. मोदी यांनी म्हटले कि, “अमेरिकेबरोबर आमची धोरणात्मक भागीदारी बळकट करण्याची आणि जपान आणि ऑस्ट्रेलियाशी संबंध दृढ करण्याची” ही संधी आहे. ते म्हणाले होते की, अध्यक्ष बिडेन यांच्यासोबतच्या बैठकीत ते भारत-अमेरिका व्यापक वैश्विक धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेतील आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील.
पंतप्रधान यांनी जाण्यापूर्वी एका विधानात असे म्हटले की, यात्रेची समाप्ती न्यूयॉर्क येथे होईल. संयुक्त राष्ट्र महासभा (यूएनजीए) मधील जागतिक आव्हान, विशेष म्हणजे कोरोना साथीचा रोग, आतंकवादी संघटनेला संपवायची आवश्यकता, हवामानातील बदल आणि इत्तर महत्वाचे विषयांची चर्चा करतील. या यात्रेत पंतप्रधान अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतील सोबतच अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन सोबत जगातील इत्तर नेत्यांच्या सोबत चर्चासत्र करून संबोधित करतील.