मुंबईतील नरीमन पॉंईंटपासून ते थेट दिल्लीपर्यंत सागरी सेतू बांधण्याचे माझे स्वप्न आहे. तसेच मुंबईतील सी लिंकला देखील विरारपर्यंत नेण्याचे आमचा मानस आहे, असे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.
पुण्यात सिंहगड रोड येथील उड्डाणपूलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते, यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा घेतला त्याचब महत्त्वाच्या घोषणाही केल्या.
ते म्हणाले, मी मंत्री असताना पुण्याशी अधिक जवळीकतेचा संबंध होता. जनतेची कामे करण्यास मी सदैव तत्पर असतो. पुण्यामध्ये मेट्रोचं काम अधिक गतीने सुरु झालं याचा मला खूप आनंद होत आहे. येणाऱ्या काळात राज्यातील आणि देशातील रस्त्यांची कामे अधिक गतीने आम्ही करणार आहोत. मात्र ज्यावेळी नागपूर मेट्रोचं काम अधिक गतीने होत होते, तेव्हा मात्र दुर्देवाने पुण्यातील मेट्रोचं काम थांबल होतं त्यावेळी मात्र माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरीच टीका झाली होती. येणाऱ्या काळात पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार. प्रशासनाच्या मागे तुतारी घेऊन मागे फिरलं तरच त्याची कामे होतात. पुण्याच्या विकासाकडे आमचं अधिक लक्ष आहे. आम्ही दिल्ली-मुंबई 12 लेन्थ हायवे बांधत आहोत. माझ्याकडे पैशांची काही कमी नाही. दिल्लीला नरिमन पॉंईट आम्ही जोडण्याचे काम करु. सी लिंकशी माझं जवळचं नातं आहे. सागरी सेतू वसई ते विरार घेण्याचा आमचा हेतू आहे.