दिल्ली येथील रोहिणी कोर्टात गोळीबार झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली आहे. यात गॅंगस्स्टर जितेंदर गोगी ठार झाला आहे. तसेच ३ लोकांना मृत्यू झाला आहे. शुक्रवारी कुख्यात गॅंगस्स्टर जितेंदर गोगी याला कोर्टात सुनावणीकरीता घेऊन जात होते. या सुनावणी दरम्यान वकिलांच्या वेशात काही लोक कोर्टात आले व गोळीबार सुरु केला. यात पोलिसांनी बॅक फर्यारिंग केली असता दोन गुंड मारल्या गेले. या गोळीबारात गॅंगस्टर जितेंदर गोगीसह एकूण तीन लोकांला मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने कुख्यात गॅंगस्स्टर जितेंदर गोगी याला २०२० ताब्यात घेतले होते. काउंटर इंटेलिजन्स टीमने त्याला गुरुग्राम येथून त्याच्या तीन साथीदारांसोबत पकडले होते. ताब्यात घेतांना दिल्ली पोलिसांकडून आठ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते. हे महत्वाचे आहे की, मारले गेलेला जितेंद्र गोगी आणि अलीपुरातील ताजपुरीयाचे रहिवासी सुनील उर्फ टिल्लू यांच्यात जवळपास एक दशकापासून गॅंगवॉर चालू आहे. पोलिसांच्या माहिती नुसार या गोळीबारात सुनील उर्फ टिल्लू याचे नाव सामील आहे.