सिंधु नदी हा केवळ भौगोलिक प्रश्न नसून भारताच्या दृष्टीने त्याला सांस्कृतिक, ऐतिहासिक व अध्यात्मिक परिमाण आहेत. भौगोलिक परिस्थिती नेहमी बदलत असते, त्यामुळे सिंधु नदी पुनश्च भारताचा भाग असेल असा आशावाद जागविताना मुंबईतील अरबी समुद्राला वास्तविक सिंधुसागर हेच नाव सार्थ आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
राज्यपाल यांच्या हस्ते ‘इंडस वॉटर्स स्टोरी’ या अशोक मोटवानी व संत कुमार शर्मा लिखित पुस्तकाचे तसेच उत्तम सिन्हा लिखित ‘इंडस बेसिन इंटरप्टेड’ या पुस्तकाचे राजभवन येथे नुकतेच प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन उभय पुस्तकांमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील अतिशय संवेदनशील असा पाणीवाटपाच्या प्रश्नाचा इतिहास, वर्तमान स्थिती, चिंता व भवितव्याचा वेध या बाबींचा उहापोह केला आहे.
यावेळी राज्यपालांनी अरबी समुद्राला सिंधुसागर हेच नाव सार्थ असल्याचे म्हटले कार्यक्रमाला लेखक अशोक मोटवानी यांचेसह अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासातील अधिकारी स्कॉट टिकनॉर, रा.स्व. संघाच्या कोकण प्रांताचे संघचालक डॉ सतीश मोढ, ऑर्गनायझरचे माजी संपादक डॉ शेषाद्री चारी, मुंबई स्टोक एक्सचेंजचे मुख्याधिकारी डॉ आशिष चौहान, भजन गायक अनुप जलोटा, डॉ राधाकृष्ण पिल्लई, एस. बालकृष्णन, बाळ देसाई, आदि उपस्थित होते.