कोलकत्ता हायकोर्टाने मंगळवारी निर्णय सांगितला कि, भवानीपुर विधानसभा सीटवर होणाऱ्या पोटनिवडणूक, ज्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उमेदवार आहेत, त्याला रद्द केल्या जाणार नाही आणि मतदान हे गुरुवारीच होणार. एका जनहित याचिकेने कोलकताच्या भवानीपूर येथील पोटनिवडणूक घेण्याच्या ‘घटनात्मक अत्यावश्यकते’च्या निवडणूक आयोगाच्या युक्तिवादाला याचिकेने आव्हान दिले होते.
तृणमूल काँग्रेसचे आमदार सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी पक्षप्रमुखांना विधानसभेवर नेण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर २०११ ते २०१६ पर्यंत ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या भवानीपूर विधानसभा जागेची पोटनिवडणूक आवश्यक होती. आता भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युवा नेत्या ४१ वर्षीय प्रियांका टिबरेवाल या , ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत, जे कोलकत्ता उच्च न्यायालयात वकील आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पद सांभाळणाऱ्या ममता बॅनर्जीला भवानीपुर येथील पोटनिवडणूक जिंकणे जरुरी आहे, असे झाल्यास त्या पदावर राहतील. पोटनिवडणुकीचे निकाल ३ ऑक्टोबरला घोषित करण्यात येतील.
संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीला मंत्रिपद सांभाळण्यासाठी सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधानपरिषद येथील निवडणूक जिंकणे अनिवार्य असते. मार्च- एप्रिल २०२१च्या पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुका ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथून भाजप च्या शुभेन्दू अधिकारी याच्या विरोधात निवडणूक हरल्या होत्या.