1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मोदी पुन्हा एकदा दिवे लावून ‘उजेड पाडणार’

Modi-Shah
Spread the love

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरांमध्ये दिवा लावण्याचे आवाहन केले होते. मोदींनी आता त्याचद्धतीचे आवाहन पुन्हा एकदा केले असून यंदा १८ लाख दिवे लावण्यासंदर्भातील शब्द मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मिळालेल्या लाभार्थ्यांकडून घेतला आहे. नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये बोलताना केंद्र सरकारसोबतच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या कामाचे तोंडभरुन कौतुक करताना कामांचा पाढा वाचतानाच दिवाळीमध्ये घरी दोन दिवे लावा, असे आवाहन केले आहे.

मोदींनी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना, अयोध्येमध्ये यंदा दिवाळीत साडेसात लाख दिवे लावणार असल्याची माहिती मला आता देण्यात आली. उत्तर प्रदेशला मी आवाहन करतो की राज्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ज्यांना ज्यांना घरे मिळाली आहेत, त्या ९ लाख लाभार्थ्यांनी आपआपल्या घरांमध्ये प्रत्येकी दोन दिवे लावावेत. म्हणजे अयोध्येमध्ये साडेसात लाख दिवे लागतील, तेव्हा या घरांमध्ये १८ लाख दिवे लावले जातील. भगवान रामालाही याचा आनंद होईल, असेही मोदी म्हणाले.

मोदींनी यावेळी आम्ही या घरांच्या योजनांमध्ये फार सकारात्मक बदल केल्याचेही सांगितले. जे सरकार २०१४ च्या आधी होते, त्यांनी शहरांमधील योजनांमध्ये केवळ १३ लाख घरे मंजूर केली. त्यापैकी ८ लाख घरे बनवण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १ कोटी १३ लाखांहून अधिक घरांच्या उभारणीसाठी परवानगी दिली. ५० लाख घरे देण्यात आली. आम्ही घरांच्या डिझाइनपासून निर्मितीपर्यंत सर्व गोष्ट घरं वापरणाऱ्यांना ठरवायला सांगितले. दिल्लीत एसी कार्यालयांमध्ये बसून आम्ही निर्णय घेतले नसल्याचे मोदी म्हणाले.

घरे किती मोठी असतील याचा निर्णय आम्ही घेतला. २२ स्वेअर मीटरपेक्षा छोटे घर असणार नाही, असे आम्ही ठरवले. आम्ही थेट गरिबांना त्यांच्या खात्यांवर घर बनवण्यासाठी पैसे पाठवले. केंद्राने जवळजवळ १ लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर थेट पाठवले. आपल्याकडे काहीजण म्हणतात की मोदींनी काय केले. पहिल्यांदाच मी तुम्हाला असे काही सांगू इच्छितो की माझे जे सहकारी आहेत, जे झोपड्यांमध्ये राहत होते, ज्यांच्याकडे पक्के घर नव्हते, अशा ३ कोटी घरांना या कार्यकाळामध्ये एकाच योजनेने लखपती होण्याची संधी मिळाली, असेही मोदींनी नमूद केले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    सपा ने संपूर्ण मुसलमान समाजाचे वोट हिरावले….. ;मायाव...

    March 11th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत हरल्यामुळे बहुजन समाज पार्टीने (बसपा) च्या राष्ट्रीय अध्यक्ष मायाव...

    “पीएम केअर फंडमध्ये जमा झालेला पैसा कुठे जातोय...

    October 14th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमाजी न्यायमूर्तीं लोकूर यांनी व्यक्त केली चिंता पीएम केअर फंडमध्ये जमा पैसा कुठे जातोय हे आम्हाला माहिती ना...

    कॉंग्रेसच्या आमदार पुत्रास बलात्कार प्रकरणी अखेर अटक

    October 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love6 महिन्यापासून होता फरार मध्य प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी यूथ काँग्रेस संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका तरुण...