NEET SS Exam देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. कारण यावर्षी जुन्या पॅटर्ननुसारच परीक्षा होणार आहे. नवीन पॅटर्न पुढील वर्षापासून लागू होणार आहे. यामुळे यावर्षी NEET SS Exam देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की पोस्ट ग्रॅज्युएट नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-सुपर स्पेशालिटी (NEET-SS) 2021 जुन्या पॅटर्ननुसार घेण्यात येईल आणि नवीन पॅटर्न पुढील वर्षापासून लागू होईल.
राष्ट्रीय परीक्षा मंडळाने सांगितले होते की, देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा पुढे ढकलली जाईल. ही परीक्षा आता नोव्हेंबर ऐवजी जानेवारीत होणार आहे. तसेच, NBE ने SC ला विनंती केली आहे की नवीन पॅटर्नला परवानगी द्यावी, उमेदवारांना वेळ देण्यासाठी परीक्षा जानेवारीपर्यंत पुढे ढकलावी.