आजपासून सर्व देवांची बंद असलेली दारे उघडण्यात आली आहे. मागील वर्षीपासून असलेल्या कोरोना संकटामुळे मंदिर बंद ठेवण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने दिलेल्या निर्णयावरून नवरात्रोउत्सवापासून मंदिरे खुले झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
परंतु यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे दिसत आहे. यावेळी भाविकांनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. तर अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपली मंदिरे पावणे दोन वर्ष बंद होती. मात्र मोठ्या कालावधीनंतर आता मंदिरे सुरु होत असल्याचे पाहून सर्वांना आनंद होत आहे. आता आपण सर्वांनी नियमाचे पालन करून गणरायाच दर्शन घेऊ या आणि या कोरोना हरवू या.’ असे यावेळी भरणे म्हणाले.
मोठ्या कालावधीनंतर ‘देवाचे दार’ उघडल्याने पुण्यात देखील उत्साही वातावरण आहे. पुण्यातील विविध भागातील मंदिरांमध्येही रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची साफसफाई आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच मंदिरामध्ये ऑनलाइन दर्शनाची सोय करण्यात आल्याने गर्दी न करता भाविकांना दर्शन घेता येणार आहे.