1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

देशात वीज टंचाई निर्माण होण्याची भीती

Spread the love

देशात गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या संभाव्य टंचाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कोळशाचा पुरवठा राज्य स्तरावर होत नसल्याचे चित्र दिसत असताना दुसरीकडे केंद्रीय पातळीवरून मंत्र्यांकडून कोळसा टंचाई नसल्याचे स्पष्ट केले जात असल्यामुळे कोळशाच्या पुरवठ्याची नेमकी परिस्थिती काय आहे आणि खरच देशात वीजकपात करण्याची वेळ येऊ शकते का? याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकाराचा आढावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात देखील दोनच दिवसांपूर्वी महावितरणकडून वीज वापरामध्ये काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वीजनिर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे आगामी काळात देशाच्या अनेक भागांमघ्ये वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोळसा उत्पादन, पुरवठा आणि वीजनिर्मिती या सर्व बाबींचा आज आढावा घेणार आहेत.

सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात कोळसा आणि वीज उत्पादन, वितरणाशी संबंधित मंत्र्यांची बैठक घेऊन त्यामध्ये सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. अमित शहा यांनी या बैठकीनंतर देशात कोणत्याही प्रकारची कोळसा टंचाई नसल्याचा दावा केला आहे. पण, याआधीच काही राज्यांनी कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची भिती व्यक्त केली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशभरात टोमॅटो दराला लागली आग, प्रति किलो १२० रुपयांवर!

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदैनंदिन आहारात असलेला टोमॅटो आता काहीसा दिसेनासा होण्याची चिन्हे आहेत. देशभरात टोमॅटो दराचा भडका उडालाय. वि...

    गुजरात दंगलीत मुख्यमंत्री मोदींना मिळालेल्या क्लीन च...

    December 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the love2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विशेष तप...

    लग्न समारंभात १३ महिलांचा दुर्दैवी मृत्यू

    February 17th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर:उत्तर प्रदेशात लग्न समारंभ सुरु असतांना एक दुर्दैवी घटना घडली. कुशीनगर येथे बुधवारी रात्री ८. ३० च्य...