केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सातत्याने करतं आहे. NCB, CBI, ED यांचा वापर राजकीय दृष्टीने केला जातो आहे हे सातत्याने दिसतो आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी काही आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आणि त्यातून जे वातावरण निर्माण केलं गेलं त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा द्यावा लागला. एक जबाबदार अधिकारी असे बेछूट आरोप करतो असं कधी घडलो नाही. आता परमबीर सिंग कुठे आहेत? अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा दिला. पण परमबीर सिंगांचं काय? त्यांच्यावर किती आरोप झाले.
अनिल देशमुखांनी सत्ता सोडली मात्र परमबीर सिंग गायब झाले हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. अनिल देशमुख यांच्या घरी काल पाचव्यांदा छापा मारला. एकाच घरात पाचवेळा जाऊन काय मिळतं हे माहित नाही पण त्यांनी विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. याचा विचार नागरिकांनीही करण्याची गरज आहे