1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

दहशतवाद्यांची आता खैर नाही; जम्मू काश्मीरमध्ये ‘या’ नव्या अधिका-याची नियुक्ती

army sevicemen
Spread the love

जम्मू-कश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या टार्गेट किलिंग प्रकरणी आता केंद्र सरकारनं मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता केंद्राची नजर असून, आता त्या दृष्टीनं मोठ्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर एका खास व्यक्तीला जम्मू काश्मीरला पाठवण्यात आलं आहे. सीआरपीएफकडून जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात आलेली ही व्यक्ती आहे डीजी कुलदीप सिंह. ते नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेन्सीचेही डीजी असल्याचं सांगण्यात येत आहे.

गृहमंत्रालयाची कडक कारवाई

केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गृह मंत्रालय काश्मीरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. शिवाय आयबी, एनआयए, सैन्यदल आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा या ठिकाणांचा दौरा करत आहेत. त्यामुळं या भागामध्ये सध्या बऱ्याच घडामोडीही घडत असल्याचं कळत आहे.

सुरक्षा यंत्रणांकडून उचलल्या जाणाऱ्या या पावलांमुळे दहशतवादी संघटनांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असणाऱ्या टार्गेट किलिंग प्रकरणानं साऱ्या देशाला हादरा दिला आहे. दहशतवाद्यांच्या या कारवाया पाहता आता त्यांचे हल्ले आणखी सहन न करण्याचा मनसुबा बाळगत गृह मंत्रालय सक्तीच्या कारवाई करताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यापासून भारतीय संरक्षण यंत्रणांकडून जवळपास 132 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, 254 दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    देशभरातील सहा हजार ब्लॉकमध्ये आता ATM मधून मिळणार औषधे

    September 18th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveरविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी म्हणा किंवा बँक कर्मचारी संपाच्या दरम्यान बँका जरी बंद असल्या तरी देखील आपण ए...

    गोव्यात भाजपचे सरकार स्थापन होणार; विजयाचे सर्व श्रे...

    March 10th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveगोव्यात भाजपाचे सरकार स्थापन होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून या निकालांबद्दल भाजपाचे गोव्यातील प्रभ...

    ..तर, इलेक्ट्रीक गाड्या खरेदी करा; इंधन दरवाढीवर गडक...

    October 23rd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंधन दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. इंधन दरवाढ आता नवनवीन उच्चांक करताना दिसत आहे. त्यातच केंद्...