केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांनी आज व्हर्चुअल कार्यक्रमात फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट कार्यालयाचे राज्यमंत्री लॉर्ड तारिक अहमद यांच्यासह संयुक्तपणे महात्मा गांधी नरेगा अंतर्गत भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित पाणलोट नियोजनामध्ये हवामान संबंधी माहिती एकत्रित करण्यासाठी हवामान लवचिकता माहिती प्रणाली आणि नियोजन (CRISP-M) टूलचा प्रारंभ केला. विविध प्रकल्पांमध्ये हवामान लवचिकता प्रदान करण्याची यंत्रणा म्हणून मनरेगाचा वापर याआधीच केला जात आहे – गिरीराज सिंह
गिरीराज सिंह म्हणाले की, CRISP-M टूल महात्मा गांधी नरेगा योजनेचे जीआयएस आधारित नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये हवामानविषयक माहिती जोडण्यास मदत करेल. त्यांनी ब्रिटिश सरकार आणि सर्व हितधारकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले ज्यांनी ही टूल विकसित करण्यात ग्रामीण विकास मंत्रालयाला मदत केली आणि आशा व्यक्त केली की CRISP-M च्या अंमलबजावणीमुळे आपल्या ग्रामीण समुदायासाठी हवामान बदलांच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन शक्यता खुल्या होतील. हे टूल सात राज्यांमध्ये वापरले जाईल जिथे फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO), ब्रिटन सरकार आणि ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार संयुक्तपणे हवामान लवचिकतेच्या दिशेने काम करत आहेत. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि राजस्थान ही राज्ये आहेत.