1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उत्तराखंडमध्ये अंदाधुंद पावसामुळे पूरस्थिती, ४६ जणांचा मृत्यू

amit shah
Spread the love

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या अंदाधुंद, मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आत्तापर्यंत ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि त्यातून निर्माण झालेली पूरस्थिती असा घटना घडल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळी राज्यभर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये आत्तापर्यंत तब्बल ४६ लोकांना आपले प्राण गमवाले लागले आहेत. त्यासोबतच, अनेकजण बेपत्ता असल्याची देखील माहिती मिळत आहे. उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी देखील आज पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पूरस्थितीची माहिती दिली. “प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ११ जण बेपत्ता आहेत. काही जण जखमी देखील जाले आहेत. एकूण मृतांचा आकडा ४६ पर्यंत गेला आहे”, असं ते म्हणाले. दरम्यान, पाऊस आता कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. “पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पुन्हा सर्व सुरळीत व्हायला वेळ लागेल. रस्ते वाहून गेले आहेत, दरडी कोसळल्या आहेत, काही ठिकाणी नद्यांनी आपले मार्ग बदलले आहेत. गावांना फटका बसला आहे, पूल कोसळले आहेत”, अशी माहिती त्यांनी दिली

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

    April 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआज दि. २२ एप्रिलपासून लातूर येथील उदगीरमध्ये ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे....

    दोन दिवसांत पाऊस अरबी समुद्रात धडकणार : आयएमडी

    May 19th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveयंदा ‘असनी’ चक्रीवादाळामुळे वेळेआधीच मान्सून दाखल होत आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून दक्...

    केजरीवाल सरकारचे इलेक्ट्रीक वाहन धोरण जाहीर

    January 18th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात दिल्लीचे अरविंद ...