1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

कॉंग्रेसला हटवण्यासाठी स्थानिक मित्र पक्षांशी युती करा; सुधीर मुनगंटीवारांनी दिला कानमंत्र

Sudhir Mungantiwar
Spread the love

राजुरा नगरपालिका काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवाळीनंतर नगरपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपली रणनीती आखत आहे. राजुरा नगरपरिषदेचे सत्तांतर करण्यासाठी ‘काँग्रेस हटाव’ मोहिमेची रणनीती भाजपने आखलेली आहे. कॉंग्रेसला हटवण्यासाठी स्थानिक मित्र पक्षांशी युती करण्याचा कानमंत्र भाजपच्या स्थानिक नेत्यांना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

मुनगंटीवार यांचा मंत्र चालल्यास तीन माजी आमदार विरुद्ध विद्यमान आमदार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे दिवाळी अगोदरच राजकीय वातावरण तापलेले आहे. राजुरा नगरपालिकेत स्थापनेपासून सर्वाधिक कार्यकाळ सत्ता काँग्रेसची राहिलेली आहे. विद्यमान नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सर्वाधिक तीन वेळा नगराध्यक्ष पद भूषविले आहे. जनतेमधून दोनदा थेट निवडून आलेले आहेत. त्यामुळे शहरातील मतदारांची नाडी अरुण धोटे यांना चांगलीच माहिती आहे. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने व इतर पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे.

राजुरा नगरपालिकेत एकूण 18 सदस्यांपैकी विद्यमान नगर परिषदेमध्ये काँग्रेसकडे 9 सदस्य व 1 अपक्ष असे एकूण १० सदस्य आहेत. नगरपालिका सभागृहात काँग्रेसचे 9, भाजप चे 3 सदस्य, शेतकरी संघटना 4 व अपक्ष 2, असे पक्षीय बलाबल आहे. राजुरा नगरपालिकेच्या स्थापनेपासून सर्वाधिक कार्यकाळ पालिकेवर काँग्रेसचे सत्ता राहिलेली आहे. नगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार ॲड. संजय धोटे, ॲड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर यांनी कंबर कसलेली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    “बुल्ली बाई”, “सुल्ली डील्स”...

    March 29th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: दिल्ली न्यायालयाने सोमवारी ‘बुल्ली बाई’ अँप प्रकरणातील आरोपी निरज बिश्नोई आणि ‘सु...

    युक्रेनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना का घातले साकडे?

    March 7th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveरशिया युक्रेन युद्धाचा आजचा ११ वा दिवस आहे. अजूनही रशियन लष्करची युक्रेनवर कारवाई सुरूच आहे. त्यामुळे युक्र...

    आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन (‘प्रेस फ्...

    May 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveसंयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने 3 मे हा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन किंवा फक्त जागतिक पत्रकार दिन म्हणू...