साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे आदेश..!!
लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील साक्षीदारांचे संरक्षण करण्याचे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला तीव्र शब्दांत फटकारले. तसेच साक्षीदारांचे जबाब लवकरात लवकर दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवावेत, असे न्यायालयाने आज म्हटले आहे. आम्हाला वाटतं तुम्ही पाय काढून घेत आहात. साक्षीदारांना योग्य सुरक्षा मिळेल याची खातरजमा करा, अशा कडक शब्दांत खडेबोल सुनाविले.
सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी उत्तर प्रदेश सरकारने स्टेटस रिपोर्ट उशिरा दाखल केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती रमणा म्हणाले की, संध्याकाळी उशिरापर्यंत या अहवालाची वाट पाहत राहिलो. अशाप्रकारे, सुनावणीपूर्वी अहवाल देणे चुकीचे आहे. युपी सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याची सूचना केली. पण न्यायाधीशांनी याला नकार दिला. त्यांनी अहवाल वाचला आणि सुनावणी केली.
8 ऑक्टोबर रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने मुख्य आरोपी आशिष मिश्राला अटक न केल्याबद्दल यूपी सरकारला फटकारले होते. आज, असे प्रश्न उपस्थित केले गेले की पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या अधिक कोठडीची मागणी का केली नाही? 3 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत जाण्याची परवानगी का देण्यात आली ?न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आतापर्यंत साक्षीदारांचे जबाब का नोंदवले गेले नाहीत, असा सवाल खंडपीठाचे सदस्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी केला. हरीश साळवे यांनी दसऱ्याच्या सुट्टीमुळे न्यायालय बंद असल्याचा हवाला दिला. या उत्तराने न्यायाधीश समाधानी नव्हते. खंडपीठाच्या तिसऱ्या सदस्या न्यायमूर्ती हिमा कोहली म्हणाल्या, “सरकारने अशी प्रतिमा पुसून टाकावी.