देशातील कोरोना व्हायरसचं थैमान अद्यापही कमी झालेलं नाही. भारतात बऱ्यापैकी कोरोना नियंत्रणात आला आहे. तरी मोदी सरकारने सावध भूमिका घेतली आहे. आता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना टेस्ट रिपोर्ट बंधनकारक केला आहे. भारतात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आरटी-पीसीआर टेस्ट (RT PCR Test) रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. हा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच भारतात एंट्री मिळणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रायलायने भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार भारतात येण्यासाठी प्रवाशांची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह असणं गरजेचं आहे. तरच भारतात प्रवेश दिला जाणार आहे, असं आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे आरटी-पीसीआर टेस्टमधून कळतं. सध्या हीच टेस्ट सर्वत्र केली जाते आहे. यामध्ये संक्रमित व्यक्तीचे नाक किंवा घशातील स्वॅबचे नमुने घेतले जातात. हे नमुने आणि व्हायरसच्या डीएनएची तुलना केली जाते. दोघांमध्येही समानता असेल तर त्या व्यक्तीला कोरोना आहे असं निदान केलं जातं. या तपासणीला चार ते सहा तासांचा अवधी लागू शकतो.
ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाचा डेल्टा व्हेरिटएंट थैमान घालतो आहे. लसीकरणानंतरही हा व्हायरस पसरतो आहे. त्यात ब्रिटनने आपले हवाई मार्ग पूर्णपणे खले केले आहेत, त्यामुळे ब्रिटन-भारतातील नागरिकांच्या प्रवास होऊ शकतो आणि भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारताने असं कठोर पाऊल उचललं आहे.