कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. आता मोहीम सुरु होऊन २७८ दिवस पूर्ण झाले आहे. आज देशात १०० कोटी लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरणाची विक्रमी नोंद झाली आहे. या ऐतिहासिक निमित्ताने केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. दिल्लीत राम मनोहर लोहियामध्ये अजज मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी ज्याचें लसीकरण अजून राहिले आहे त्यांनी देखील त्वरित लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
देशात १०० कोटी लसीकरण पूर्ण झाले असल्यामुळे देशभर असलेल्या ऐतिहासिक वस्तुंना तिरंग्याच्या रंगात रोषणाई केली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादचा बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला, पुण्यातील शनिवार वाडा, आगा खान पॅलेस आणि सीएसएमटी तिरंग्याच्या रुपात रोषणाई केली आहे. यामाध्यमातून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, लस उत्पादक, वैज्ञानिक यांचा सन्मान करून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहली जाईल.दिल्लीच्या एअरपोर्टवर एक खास आउटर कव्हर आज ऐतिहासिक दिनानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.३० वाजता आरएमएल रुग्णालयात होणाऱ्या खास कार्यक्रममध्ये सामील होणार आहेत. येथे ते आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत बातचित करतील.
शिवाय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया लाल किल्ला हून कैलाश खेरचे गाणे आणि एक ऑडिओ व्हिज्युअल फिल्म प्रसारित करतील. यानिमित्ताने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि स्पाइसजेटचे सीएमडी आजय सिंह उपस्थितीत असतील.१०० कोटी लसीकरणाचा टप्पायापूर्वी आरोग्य मंत्री मांडविया म्हणाले होते की, ज्यावेळी देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण होईल, त्यावेळी लाऊड स्पीकरच्या माध्यमातून विमानं, जहाजं, मेट्रो आणि रेल्वे स्टेशनवर याची घोषणा केली जाईल.