1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे: नवाब मलिक

nawab malik
Spread the love

फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करत आहे. एनसीबीचे सामील वानखेडे हे भाजपचे म्होरके आहेत. प्रसिद्धीसाठी खोट्या केसेस दाखल करून लोकांना फसविणायचे ते काम करत आहेत, असा आरोप अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. वडगाव येथील अल्पसंख्याक कार्यकर्ता मेळावा व मार्गर्दर्शन शिबिरासाठी ते गुरुवारी आले होते. त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, या बोगसगिरी बाबत अनेक पुरावे आहेत. येणाऱ्या काळात आणखी पुरावे सादर करणार आहे. दहशत निर्माण करण्यासाठी सध्या मंत्री, नेते, कार्यकर्ते यांची चौकशी करून केंद्र सरकार बोगसगिरी करीत आहेत. यंत्रणेचा कितीही गैरवापर केला तरी महाविकास आघाडीतील मंत्री, नेते , कार्यकर्ते घाबरणार नाहीत.

त्यावर एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले कि, जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईवरून नवाब मलिक मला जेल मध्ये टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो असे ते म्हणाले. सरकारची परवानगी घेऊन मी कुटुंबियांसमवेत मालदीवला गेलो होतो. मेल माझ्यावर खोटा आरोप करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाही केली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला. मलीक यांनी ट्विट केलेले फोटो मुंबईचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

    RENUKA KINHEKAR

    RENUKA KINHEKAR

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला ! उद्या सकाळ...

    August 9th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the love18 नेत्यांचा शपथविधी होणार मुंबई: शिंदे -फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० दिवसाहून अधिक काळ लोटल्यानंतर आता महार...

    एसटी कर्मचा-यांचे आंदोलन आणखी चिघळणार…!!

    November 13th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचार्‍या...

    पहिली विकेट पडली आता कॅप्टनसह सगळे याच मार्गाने जाती...

    November 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमनी लाँड्रिंग आणि १०० कोटी वसुली प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचा...