वाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी महोत्सवच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना महिला सुरक्षेवरून भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांनी योगी सरकारला घरचा आहेर दिला असून कायदा सुव्यवस्थेसंदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की,’पोलीस स्थानकामध्ये एक महिला अधिकारी आणि उप निरिक्षक नक्कीच असतात. मात्र एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छिते की संध्याकाळी पाच वाजल्यानंतर अंधार झाल्यावर पोलीस स्थानकात कधीच जाऊ नका. अगदीच गरज असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या भावासोबत किंवा पतीसोबत किंवा वडिलांसोबत पोलीस स्थानकात जा.’
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’अधिकारी सर्वांनाच गोंधळात टाकतात. मला परवा आग्रा येथून एका शेतकऱ्याचा फोन आलेला. त्याला खतं उपलब्ध करुन दिलं जात नव्हतं. माझ्या सांगण्यावर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला खत देऊ असे सांगितले. मात्र आज त्या अधिकाऱ्याने पुन्हा खत देण्यास नकार दिला आहे. अशाप्रकारचा गोंधळ खालच्या स्तरावरील अधिकारी करतात. या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कोणताही अधिकारी असं वागत असेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे करा. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करा.’