अमेरिकन सैन्याने उत्तर-पश्चिम सीरियामध्ये हवाई हल्ला केला ज्यात अल-कायदाचा वरिष्ठ नेता अब्दुल हमीद अल-मातार मारला गेला असल्याचे अमेरिकेकडून सांगितले जात आहे. अमरिकेचे सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर जॉन रिग्स्बी यांनी ही माहिती दिली आहे. MQ-9 विमानाने केलेल्या या हवाई हल्ल्यात कुठल्याच नागरिकांना इजा झाली नाही असे देखील सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार अल-कायदा हा अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी कायम धोका आहे. दहशतवादी संघटना सीरियाचा सुरक्षित आश्रयस्थान म्हणून वापर करते आणि येथून दहशतवादी कारवायांची योजना आखते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. अमेरिकेचे लष्कर मेजर जॉन रिग्स्बी यांनी एका लेखी निवेदनात म्हटले आहे की, ‘या अल-कायदा नेत्याची हत्या दहशतवादी संघटनेच्या जागतिक हल्ल्याच्या योजनांची तोडफोड करेल, आता अमेरिकन नागरिक, आमचे मित्रराष्ट्र आणि निष्पाप लोकांचा छळ आणि हल्ले थांबतील.