बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अटक प्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना समीर वानखेडे यांच्या कामावर संशय व्यक्त करत अनेक आरोप करण्यात आले आहे. यातच रविवारी पंच प्रभाकर साईलने केलेल्या 25 कोटींच्या खंडणीच्या आरोपामुळे प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
यानंतर आता ज्येष्ठ वकील कनिष्क जयंत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ॲड. कनिष्क जयंत यांनी १२ आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांना आर्यन खान क्रुझ प्रकरणात के. पी. गोसावी, मनीष भानुशाली, ऋषभ सचदेवा, प्रतीक गाभा, आणि अमीर फर्निचरवाला यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. या लोकांनी एकत्र येऊन कट कारस्थान करत आर्यन खानचे अपहरण केले आणि त्याच्या वडिलांकडून म्हणजेच शाहरुख खानकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.