1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

सावंगी रूग्णालय परिसरात शिरलेला बिबट्या सहा तासानंतर वन विभागाच्या जाळ्यात!

Spread the love

वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालय परिसरात सोमवारी चांगलाच धुमाकूळ उडाला होता. रूग्णालयाच्या वसतीगृहात पहाटेच्या दरम्यान बिबट्याने शिरकाव केल्याचे कर्मचाऱ्यांना दिसून आले. घाबरलेल्या कर्मचाऱ्यांच्या गडबडीमुळे बिबट्याने खिडकीत धाव घेवून लगतच्या झाडावर उडी मारली. त्यानंतर तो जवळच्याच नाल्यात शिरला. मात्र हे माहित नसल्याने रूग्णालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले. वाघ रूग्णालयात फिरत असल्याचे समजून सर्वत्र धावपळ सुरू झाली. एकच गोंधळ उडाला मात्र खरी माहिती समोर आल्यावर रूग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगत रूग्णालयाचे दरवाजे व खिडक्या बंद करीत वन विभागाला याविषयी माहिती दिली. माहितीनंतर वन अधिकारी, पिपल फॉर अ‍ॅनिमल्स तसेच वाईल्ड लाईफ वार्डनच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली.

बिबट्या नाल्यात अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्याचे कोणतेच मार्ग नव्हते. बेशुध्द करणारे दोन इंजेक्शन त्यामूळे वाया गेले. आणखी दोन इंजेक्शनचा मारा केल्यावर एक बिबट्याच्या शरिरावर लागले. बेशुध्दावस्थेतील बिबट्यावर जाळी टाकून अखेर त्याला बाहेर काढण्यात आले.

पशुंचा आश्रय स्थान असलेल्या करूणाश्रमात या दीड वर्षीय बिबट मादीस सध्या ठेवण्यात आले आहे. भूकेल्या अवस्थेतील या मादीवर योग्य तो उपचार झाल्यानंतर तिचे स्थलांतरण करण्याबाबत निर्णय घेतल्या जाईल, अशी माहिती जिल्हा वन अधिकारी सेपट यांनी दिली. बिबट्याने दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची चर्चा निराधार असून कोणतेही दुर्देवी घटना झाली नसल्याचे वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी दिली आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    ‘वन्स अगेन..छापेमारी’, देशमुखपुत्र सलीलव...

    October 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. अनिल देशमुख यांच्य...

    ‘माय मराठी’ प्रातिनिधिक कविता संग्रहासाठ...

    February 8th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveजागतिक मराठी भाषा गौरव दिनी होणार प्रकाशन नागपूर: मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ‘जागति...

    नागपूर महानगरपालिकेचा सन २०२१-२०२२ चे सुधारित व २०२२...

    April 13th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: सन २०२१-२०२२ चे सुधारित व २०२२-२०२३ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प नागपूर महानगरपालिका आयुक्त राध...