क्रूझ अंमली पदार्थ प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून, दररोज त्याच्याशी संबंधित छोट्या-मोठ्या बातम्या समोर येत आहेत. सत्र न्यायालयात जामीन अर्ज फेटाळल्यानंतर, आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि या प्रकरणावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली होती. मात्र, कालही आर्यनला जामीन मिळू शकला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर आज (२७ ऑक्टोबर) सुनावणी होणार आहे.
गर्दीमुळे तुटला न्यायालयाचा दरवाजा
दरम्यान, कोर्टातून असे फोटो समोर आले आहेत, जे पाहून सर्वच चकित झाले आहेत. फोटोमध्ये कोर्टरूमचा दरवाजा तुटलेला दिसत आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान एवढा मोठा जमाव जमला होता की, कोर्टरूम लोकांनी भरून गेले होते. त्यामुळे कोर्टरूमचा दरवाजाच तुटला गेला. या खटल्याची सुनावणी एन.डब्ल्यू.सांब्रे यांच्याकडे सुरू असताना, पोलिसांनी लोकांना खोलीतून बाहेर काढण्यासाठी ते काही वेळासाठी खोलीतून बाहेरही गेले होते.
हायकोर्टाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आर्यनच्या जामीन याचिकेवर सुनावणी सुरू असलेली कोर्टरूम आहे. या खोलीत वकील आणि मीडिया रिपोर्टर्सची प्रचंड गर्दी जमली होती. आर्यन खानच्या केसचा क्रमांक ५७ होता. कोर्टरूममध्ये जमलेली गर्दी पाहून, न्यायाधीशांनी कर्मचाऱ्यांना ज्या वकिलांची प्रकरणे जास्त गंभीर नाहीत त्यांना बाहेर काढण्यास सांगितले.
या गर्दीमुळे कोरोनाचे नियमही पाळले जात नाहीत, असे न्यायाधीशांनी म्हटले नाही. यानंतर अनेक वकील आणि मीडिया रिपोर्टर्सना बाहेर काढण्यात आहे. संध्याकाळी चार वाजता लोकांचा मोठा जमाव कोर्टात जमला होता आणि आर्यनचे वकील मुकुल रोहतागी यांना या गोंगाटामुळे युक्तिवाद मांडणे कठीण झाल्याचे दिसत होते. यानंतर न्यायालयाचा दरवाजाही तुटला, जो आजच्या सुनावणीसाठी पुन्हा नीट करण्यात आला आहे.