कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 36 करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.55 टक्के आहे.
राज्यात सध्या पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 3759 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव 16, नंदूरबार 1, धुळे 6, जालना 20, लातूर 68, परभणी 34, हिंगोली 19, नांदेड 25, अकोला 21, अमरावती 18, वाशिम 03, अकोला 21, बुलढाणा 05, नागपूर 65, यवतमाळ 6, वर्धा 6, भंडारा 3, गोंदिया 2, चंद्रपूर 15, गडचिरोली 2 या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्याच्या आरोग्या मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 24, 39, 900 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66,09,292 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1,68,338 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 908 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 18,465 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, पुणे शहरामध्ये सध्या 792 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 135 रुग्ण गंभीर आहेत. तर 109 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5493 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 35 लाख 40 हजार 481 प्रयोगशाळा तपसणी करण्यात आली आहे.