नवाब मालिकांचा खळबळ जनक आरोप
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेत समीर वानखडे यांच्या धर्माबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर रामदास आठवले आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष यांच्या आणि वानखेडे परिवाराच्या भेटीवरही आक्षेप नोंदवला आहे. त्याचबरोबर संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती क्लीन चिट कशी काय देऊ शकते असा सवाल देखील त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना कागदपत्र तपासण्याचा अधिकार नाही असे सांगत त्यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. आणि याच अनुषंगाने या साऱ्या घटनेबद्दल राष्टपतींकडे तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर काल झालेल्या आठवलेंच्या पत्रकार परिषदेवर उत्तर देताना त्यांनी मी कधीच त्यांच्या पत्नीवर आणि मुलांवर कधीच टीका केले नसल्याचे सांगितले आहे.
नवाब मालिकांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खळबळ जनक आरोप
नवाब मालिकांनी भाजपचे एक नेते जयदीप राणा हे ड्रगच्या तस्करीबद्दल जेलमध्ये आहेत आणि त्याचे संबंध थेट महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. फडणवीसांच्या कळात त्यांच्या अमृता फडणवीस यांनी नद्यांवर एक गाणे काढलेहोते ज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील दिसले होते आणि याच गाण्यावर मालिकांनी आक्षेप घेत जयदीप राणा हे या गाण्याचे स्पॉन्सर होते असा हल्लाबोल नवाब मालिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तसेच जयदीप राणे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळचे संबंध असल्याचे देखील त्यांनी केला आहे.
मुंबईत ड्रग्सचा धंदा करता यावा यासाठीच समीर वानखडे यांना मुंबईत आणण्यात देखील देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात होता आणि यासोबतच मुंबई आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ड्रग्सचा धंदा चालू आहे असा खळबळजनक आरोप मालिकांनी केला आहे.