क्रूझ ड्रग्ज प्रकरण दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना देखील क्रूझवरील पार्टीचे निमंत्रण दिलं होतं, पण मी पार्टीला गेलो नाही, अशी माहिती त्यांनी आज (८ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून दिली आहे.शेख म्हणाले, ‘मी काशिफ खानला ओळखत नाही. त्याने मला पार्टीचे निमंत्रण दिलं होतं. पण, मी पार्टीला गेलो नाही. क्रूझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. या पार्टीत काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे देखील मला माहीत नाही.
त्या संबंधीत तपास एजन्सी करावे’, अशी माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.मी मुंबईचा पालकमंत्री असल्यामुळे अनेक ठिकाणी लोक मला बोलावलं जातं. त्यामुळे अनेक लोक लग्न सोहळे, वाढदिवसाला मला बोलवत असतात. त्याचप्रमाणं मला या पार्टीचंही आमंत्रण होतं. या प्रकरणात षडयंत्र होतं की नाही याचा एजन्सी तपास करत आहे, असं ही अस्लम शेख म्हणाले.
‘काशिफ खाननं मला फोन केला आणि मी त्याच्यासोबत बोलल्याचे मला आठवत नाही.
आम्ही दोघेही एकमेकांना ओळखत नाही. तो एका ठिकाणी मला भेटला आणि मला निमंत्रण केले आणि तिथेच ही गोष्ट संपली,’ असे त्यांनी सांगितले.गुजरातमधील २० हजार कोटी ड्रग्जची चर्चा नाहीमहाराष्ट्र सरकारला पाडण्याचे आणि बदनाम करण्याचे प्रयत्न सुरुवातीपासूनच चालू आहेत. मला या गोष्टीचं दु:ख आहे की, गुजरातमध्ये २० हजार कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले, मात्र मीडियानं यांची कुठे चर्चा केलं नाही. परंतु, क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचे नाव आल्यानंतर मीडियानं कव्हरेज सुरू केलं.