सांगली येथील बस स्थानकासमोर सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थांबविण्यात आले. पोलिसांनी आंदोलन मोडीत काढून शिवशाही बसची वाहतूक सुरू केली. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर एसटी कर्मचारी तीन दिवसांपासून धरणे आंदोलन करत होते. कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.
सांगली शहर बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एसटी कर्मचाऱ्यांकडून तंबू उभारून धरणे आंदोलन करण्यात येत होतं. बस वाहतूक सुरू करण्यास हे आंदोलक विरोध करत होते. यानंतर शुक्रवारी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि बस स्थानकातून शिवशाहीची वाहतूक सुरू केली.
बस स्थानकाचे प्रवेशद्वारही खुलेयामुळे आता गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेले बस स्थानकाचे प्रवेशद्वारही खुले करण्यात आले आहे. त्याबरोबर एसटी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात शिवशाही बसची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सकाळी पहिली शिवशाही सांगलीहून पुण्याकडे रवाना झाली. दरम्यान, पोलीस कारवाई विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.